हृदयी तव ठेउनी माथा, हलकेच मी विसावता,
भिनली हि नीज नयनी, शांत झाली आर्तता !
अवचित मग जाग येता, तुझ्या हृदय-स्पंदनी,
मिटले नेत्र जाणती रे, व्यथा ज्या तुझ्या मनी !
मिठी तुझी का घट्ट झाली, हालता मी उगा जरी,
जाईन मी कुठे कशाला, स्वर्ग-सुख ते तुझ्या उरी !
वाटे साद घाली मज रातराणीचा सुगंध
का सुवास हा तव तनुचा, नशीला अन मंद-धुंद !
बघ कसे बिलगून जाती, मोरपंखी लुब्ध वारे,
कि श्वास हे तुझेच सखया, केसांतून मम सळसळणारे !
राहू दे एकांत आपुला, शांत-सुंदर अन स्तब्ध !
मौन हे राहू दे उशाशी, नको बोलबाला अन शब्द !
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपला
पहाटराणी अल्लड आली, मौनखेळ हा संपला !!

" मिठी तुझी का घट्ट झाली, हालता मी उगा जरी,
ReplyDeleteजाईन मी कुठे कशाला, स्वर्ग-सुख ते तुझ्या उरी ! "
AWESOME..... :)