चालता चालता पावसाचे थेंब अचानक पडू लागावेत आणि एक चुकार
थेंब राप्प्कन कानात जावा , तो मेंदूत भिनत जाणारा थेंबभर गारवा
- म्हणजे आयुष्य..
आपल्याच तंद्रीत , कुठल्याश्या गणिती विचारात पाय ओढत चालत असावं आपण ..आणि अचानक एका दमात श्वासात भिनणारा प्राजक्ती गंध - म्हणजे आयुष्य..
अंगणातल्या ब्रह्मकमळाच्या एकलकोंड्या पानातून फुटलेले सुरेख इवले पान पाहून चेहऱ्यावर फुललेले अस्फुट हसू आणि डोळ्यात डुलणारी पानांची प्रतिबिंबे - म्हणजे आयुष्य ..
कसल्याश्या गहन , न सुटणार्या गुंत्यात हरवत असताना अगदी क्षणभरासाठी कुण्या मित्राचा खांद्यावर पडलेला आश्वस्त हात - म्हणजे आयुष्य..
निवांत संध्याकाळी सूर्यास्त बघताना नेमका ओंजळीत पडलेला शेवटचा किरण - म्हणजे आयुष्य..
उत्तररात्री झोपेतच कूस बदलल्यावर खिडकीतून नेमकं चेहऱ्यावर पडणारं चांदणं - म्हणजे आयुष्य..
गोठवणाऱ्या पावसात चिंब भिजून घरी जावं आणि आता गरम गरम वरणभाताशिवाय काही नको असा विचार करत गरम पाण्याच्या धारेत उभं राहावं आणि वरण -भाताचाही विसर पडून सगळं सुख सुख होऊन जावं असा क्षण - म्हणजे आयुष्य..
दारात सुरेखशी रांगोळी रेखावी आणि अनिमिष डोळ्यांनी तिचे कौतुक करत असतानाच एखादे नाजूकसे फूल वार्याने उडत येऊन अलगद रांगोळीवर पडावे ..असे परिपूर्ण सौंदर्य - म्हणजे आयुष्य ..
संध्याकाळी पळत पळत शेवटच्या क्षणी गाठलेला बोटिंग क्लब , अगदी शेवटच्या फेरीसाठी कशीबशी लागलेली वर्णी ..डुचमळत चाललेली बोट आणि दाटून आलेला अंधार ..पण पुढच्याच क्षणी स्थिर झालेली बोट अन अधिकच गहिरा होणारा काळोख . गहन शांततेत होणारा फक्त वल्ह्यांचा पाणी कापल्याचा आवाज ..जसजसे आत जाऊ तसतसे दूरवर अंधुकसे दिसणारे मंदिर आणि वार्याशी झगडणारे काही तेजस्वी दीप ..अगदी हाताशी आल्यासारखी ती चंद्राची नाजूक कोर आणि ओठावर आलेलं मनातलं गाणं-असं जादुई जग म्हणजे आयुष्य ..
ह्या आणि अश्या अनेक इवल्या सुखांचा संग्रह - म्हणजे आयुष्य .....